Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार; जयंत पाटलांनी सांगितला मास्टर प्लॅन

पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार; जयंत पाटलांनी सांगितला मास्टर प्लॅन

मुंबई : मराठवाड्यामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. त्यातच आता मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मास्टरप्लॅन आखला आहे.

मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न अत्यंत गंभीर होऊन बसलाय. उन्हाळ्यात मराठवाड्याची स्थिती दयनीय असते. यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकच्या नद्यांचं पाणी मराठवाड्यात आण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत आहे.

दरम्यान, जायकवाडी धरणाचा गाळ काढला तर त्याच्या पाणी साठ्याची क्षमता वाढेल, असंही जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

जेवणाच्या ताटावरून उठवलं, आणखी कशावरून उठवायचं सांगा; संजय राऊतांनी नारायण राणेंना पुन्हा डिवचलं

“2024 मध्येही उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार”

आमचं ठरलंय, महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा- चंद्रशेखर बावनकुळे

भाजपच्या विरोधात कोण बोलेल, त्याला ईडीची नोटीस येणं, ही फॅशनच झालीये- सुप्रिया सुळे