Home महाराष्ट्र “2024 मध्येही उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार”

“2024 मध्येही उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात त्यांनी सभा घेतली. यावेळी 2024 मध्येही उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात झाला. बाळासाहेबांनी मुंबईनंतर सर्वाधिक काळ पुण्यात घालवला. त्यामुळे पुणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता यायलाच पाहीजे. तसंच ठाकरे सरकारला आव्हान देणाऱ्यांसाठी ठोक-रे सरकार, या सरकारचे कुणीही वाकडे करू शकणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

कोणीही शिवसेनेला खाली खेचू शकत नाही. कोणतीही आघाडी युती झाली, तरी शिवसेना ही शिवसेना आहे. आघाडीत भांड्याला भांड लागणारच. ते नको असेल, तर एका पक्षाला सत्तेत आणायला पाहीजे, असेहि राऊत म्हणाले.

शिवसेना-जातपात न माणनारा पक्ष आहे. महाराष्ट्र आणि देश एकच आहे. बाळासाहेबांनी निःस्वार्थ भावनेतून राजकारण केले. त्यांचा तोच वारसा आम्ही पुढे नेत आहोत. आमच्यासाठी पद महत्त्वाचा नसून पक्ष महत्त्वाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

आमचं ठरलंय, महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा- चंद्रशेखर बावनकुळे

भाजपच्या विरोधात कोण बोलेल, त्याला ईडीची नोटीस येणं, ही फॅशनच झालीये- सुप्रिया सुळे

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ जिल्हा कार्याध्यक्षांचा राजीनामा