आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्यावर जाण्याचा निर्धार केला होता. मात्र, सोमय्या यांना कराड येथे पोलिसांनी रोखले व त्यांना मुंबईला परत सोडण्यात आले होते. या घडामोडींनंतर आता पुन्हा सोमय्या यांनी नव्याने कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुश्रीफांची चिंता वाढू शकते.
किरीट सोमय्या हे पुढील आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी कोल्हापुच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत त्यांनीच मुंबईत माध्यमांना माहिती दिली.
दरम्यान, मी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर येथे जाणार आहे. तसे पत्र मी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहे, असं सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे सोमय्या कोल्हापुरात आल्यास पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपचा शिवसेनेला अणखी एक धक्का; मुंबईत अनेक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश
“…म्हणून कंगना रणौतने आलिया भट्टला फटकारलं”
‘हे तर अपरिपक्वतेचं लक्षण’; मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावरुन फडणवीसांची टीका
संजय राऊत माझे मित्र, त्यांनी मानहानीची किंमत वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा टोला