आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्रातील 12 निलंबित आमदारांबाबत भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.. निवडणूक आयोगाकडून भाजपच्या या 12 आमदारांना दिलासा देण्यात आलाय. या निलंबित आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात गैरवर्तनाचं कारण देत भाजपच्या 12 आमदारांचं वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीत या आमदारांना मतदान करण्याची परवानगी असणार आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा दिलासा मानला जात आहे.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला होता. यामध्ये तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचं काहीही झालं तरी चालेल पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, हा तर…; दरेकरांचा टोला
“दुधा तुपाच्या गुळण्या करणाऱ्या भाजप नेत्यांची मस्ती जनता लवकरच उतरवेल”
आता शरद पवारांबद्दल काही लोक खरं बोलत आहेत- गोपीचंद पडळकर
दसरा मेळाव्याआधी शिवसेना-भाजपने एकत्र आलं पाहिजे- रामदास आठवले