आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपनेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यास रोखण्यात आलं. कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवून त्यांना ताब्यात घेतले. या घटनेवरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
इतिहासात पहिल्यादांच असे घडले आहे की, एखादा व्यक्ती भ्रष्ट्राचाराविरुद्ध तक्रार करायला जातो आणि त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येते. तुम्ही ज्या व्यक्तीच्या विरोधात तक्रारार दाखल करणार त्याचे कार्यकर्ते दंगे करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही असं सांगण्यात येतंy. मात्र हे चुकीचे आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
स्वतंत्र भारतात अशी कायदा-सुव्यवस्था कधीच पाहायला मिळाली नसेल, महाराष्ट्रात तर नाहीच नाही, महाराष्ट्रात जे चाललंय ते भयानक आहे, पण आम्ही येथे थांबणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्धची भाजपची लढाई सुरूच राहिल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचं ऑपरेशन कमळ; येत्या शुक्रवारी भाजपचे 14 आमदार राष्ट्रवादीत, तर काही शिवसेनेतही जाणार?
आमचे ‘ऑफर’ काही मैदानात पडलेले नाहीत- देवेंद्र फडणवीस
“ठाण्यात मनसेचं खळखट्याक, कशेळी टोल नाक्याची केली तोडफोड; पहा व्हिडिओ”