आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. सोमय्यांचे सर्व आरोप हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
चंद्रकांत पाटील यांनी भाजपात येण्याची मला ऑफर दिली होती. मी ही ऑफर नाकारली. त्यानंतरच माझ्यावर धाडसत्रं सुरू झालं, असं सांगतानाच सोमय्या माझ्यावर आज जे आरोप करत आहेत, त्याचे मास्टरमाइंड हे चंद्रकांत पाटीलच आहे. किरीट सोमय्या हे चुकीचे आरोप करत आहेत. किरीट सोमय्या यांची स्टंटबाजी कशासाठी? कोणाला विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे मास्टरमाइंड चंद्रकांत पाटील आहेत. पाटील यांच्या सांगण्यावरूनच ते माझ्यावर आरोप करत आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
दरम्यान,सोमय्यांनी माझ्यावर आधी एका घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यामुळे मी त्यांच्यावर 100 कोटीचा दावा ठोकणार आहे. त्याची कागदपत्रं अंतिम टप्प्यात आहे. आता त्यांनी माझ्यावर नवा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आणखी 50 कोटींचा म्हणजे एकूण 150 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
सोमय्यांवरील कारवाई गृहमंत्रालयाकडून, मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही- संजय राऊत
सोमय्यांवरील कारवाई गृहमंत्रालयाकडून, मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही- किरीट सोमय्या
राष्ट्रवादीचे गुंड सोमय्यांना धमक्या देतात, त्यांच्या केसाला धक्का लावाल तर…; सदाभाऊ खोतांचा इशारा
“मोठी बातमी! किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात”