आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी परप्रांतीय मुद्द्यावरून रोखठोक सदरामधून भाजपावर निशाणा साधलाय. ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला आणि साकीनाका बलात्काराच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी परप्रांतीयांसंबंधी भूमिका मांडली आहे.
‘एक दिवस मराठी माणसालाच महाराष्ट्रात परप्रांतीय ठरवाल, असं म्हणत, भाजपाकडूनच समाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे.’ अशी टीका राऊतांनी भाजपावर केली.
“महाराष्ट्रात अधूनमधून परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते. परप्रांतीयांचा विषय हा फक्त राज्य किंवा मुंबई, बंगळुरू, कोलकातासारख्या शहरांचा नाही तर तो राष्ट्रव्यापी विषय बनला आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद म्हणे देशभरात उमटले. ठाण्यात पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा अनधिकृत फेरीवालाही बाहेरचाच होता. त्यामुळेही राज्यात वादंग माजले. महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद कोठेच नाही. त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. पण भाजपाने यावर आंदोलन सुरू केलं आहे” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“नक्की परप्रांतीय कोण? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. मुख्यमंत्र्यांनी नेमके परप्रांतीय म्हणून राज्याचे किंवा कोणत्याही भाषिकांचे नाव घेतले नाही, पण भाजपाने हे परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय, असे परस्पर जाहीर केले. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत. मुंबईसारख्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच जाती-धर्मांचे, प्रांतांचे लोक राहतात. मुंबई तर बऱ्याच अंशी गुजराती बांधवांनी व्यापली आहे. गुजराती, जैन, मारवाडी हे पिढय़ानपिढय़ा मुंबई-महाराष्ट्राच्या जीवनप्रवाहाचे घटक बनले आहेत. मग मुंबईत भाजपा परप्रांतीय कोणाला मानत आहे?” असा सवाल करत भाजपा ‘परप्रांतीय प्रेमा’चे कढ काढीत असेल तर ते बरोबर नाही.” असंही संजय राऊतांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
‘माजी मंत्री म्हणू नका’ वक्तव्यामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला; म्हणाले…
संजय राऊत काय ‘घेऊन’ बोलतात माहिती नाही; नारायण राणेंचा टोला
“मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा”