आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून, त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
शिवसेना भवनात जाऊन तोडफोड करण्याची भाषा काही लोकांनी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार? असा सवाल करत संजय राऊतांनी युतीची शक्यता फेटाळून लावली.
उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथंच संपलं. युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली. महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. त्यामुळे आमचं चांगलं चाललं आहे, असं म्हणत राऊतांनी युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिल्याचं पहायला मिळत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेना-राष्ट्रवादीची मोठी रणनिती; भाजपला खिंडार पाडणार?”
“जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत; राजकीय चर्चांना उधाण”
“मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रूग्णालयात; तीन दिवसांपासून उपचार सुरू”
पवारसाहेबांच्या स्वप्नातील बारामती निर्माण करतोय- अजित पवार