आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काल दिल्ली पोलिसांनी ६ संशयित दहशतवाद्यांना अटक केली. यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. अशातच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. याला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर प्रत्युत्तर दिलंय.
ताईंची बौद्धिक पातळी किती सुमार दर्जाची आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्रद्वेषाने या ताईंना एवढं पछाडलं आहे की, हे दहशदवादी दिल्लीत पकडले असताना त्यांना महाराष्ट्रात पकडलं असल्याचं बरळत आहेत. व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईंनी उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला जंग कमी होऊन त्यांच्या डोक्याला योग्य ती चालना मिळेल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होऊन त्यांच्या डोक्याला योग्य ती चालना मिळेल, असा टोलाही रुपाली चाकणकर यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, ‘दिल्ली पोलिस येऊन मुंबईतली आतंकवादी पकडत आहेत, मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजायला बसवलीये का?, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती.
उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होऊन त्यांच्या डोक्याला योग्य ती चालना मिळेल.#शुभम_भवतु
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
‘सरकारने आता तरी जागं व्हावं’, मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप
सर्व निवडणुकीसाठी अध्यादेश लागु होईल याची खात्री सरकार देईल का?; पंकजा मुंडेंचा सवाल
भाजपाला आंदोलनाची नौटंकी करून पाप झाकता येणार नाही; ओबीसी अरक्षणावरुन नाना पटोलेंचा हल्लाबोल
मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजण्यासाठी ठेवली आहे का?; चित्रा वाघ यांचा सवाल