मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
आता राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या गृह विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
दरम्यान, माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहे. यामुळेच महिला सुरक्षित राहणे गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षितेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. ठाकरे सरकारने त्यांची सूचना मान्य करत पोलिसांना विशेष निर्देश दिले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, तर रातोरात मुख्यमंत्री का बदलला?, हेच का गुजरात माॅडेल?”
बलात्काऱ्याला आमच्या ताब्यात द्या, इथं न्याय होणारच! मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या
राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केली; बावनकुळेंचा घणाघात
प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा…; रुपाली चाकणकरांचा इशारा