कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे. आधी 11 जणांवर आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. यावर आता हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.
सोमय्या यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा हसन मुश्रीफांनी केला आहे. तसेच रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, माझ्याकडे बेनामी संपत्ती असल्याचा शोध सोमय्या यांनी कुठून लावला? चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काही तरी माहिती दिल्यानंतर सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत, असं मुश्रीफ म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेसचे राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”
“किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या मालिका सुरूच, हसन मुश्रीफांवर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”
“राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, वंचितचा ‘हा’ मोठा नेता बांधणार हाती घड्याळ”
कोकणातील घडामोडींना वेग; आता नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?