मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकार निशाणा साधलाय.
राज्य सरकारने ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही, हे आधीच ठरवलं आहे, असं म्हणत ‘राज्य निवडणूक आयोगाला संविधानानुसार प्रत्येकी 5 वर्षांनी निवडणुका घ्याव्या लागतात. मात्र, राज्य निवडणूक आयोग वेळेवरच निवडणुका घेणार. पण या सरकारने ओबीसी समाजातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचे वक्तव्य केलं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या बैठका घेतल्या आणि वेळकाढू पणा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने ओबीसी जनतेला न्याय मिळेल की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन महिन्यात इम्पेरीकल डाटा गोळा करून ओबीसींना आरक्षण द्यावे, अन्यथा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही. या सरकारविरोधात भाजपा तीव्र आंदोलन करेल.’ असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलंय, त्यामुळे CM नाही, PM बदला”
“…त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर”; प्रविण दरेकरांचा राज्य सरकारवर घणाघात
‘औकातीच्या बाहेर घोषणा करायची अन्…’; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला
बाळासाहेबांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता हरपला- अजित पवार