अहमदाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे.
नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले. गांधीनगरमध्ये भाजप कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, ज्येष्ठ नेते नितीन पटेल हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तरीही भाजपने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने राजकीय निरीक्षकही चक्रावून गेले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवार यांनी सहकुटुंब घेतले मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वरील बाप्पाचे दर्शन
चंद्रकांत पाटील म्हणजे अफवा पसरविणारे नेते, हवेत गोळीबार करू नका; संजय राऊतांचा टोला
उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस, त्यांना शुभेच्छा- किरीट सोमय्या
शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं; बाळासाहेब थोरातांचं आवाहन