मुंबई : आजच्या काँग्रेस ही उत्तर प्रदेशातील हवेली मोडकळीस आलेल्या जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस पक्षाच्या विचाराचे जे आहेत आणि राज्यघटनेच्या मुलभूत तत्वांशी जे बांधील आहेत, त्यांनी सरळ काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली यावं, असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांना यावेळी केलं. तसेच काँग्रेस पक्षावर टीका करण्यापेक्षा राज्यघटना टिकवण्यासाठीच्या लढाईत एकत्र यावं, असंही थोरातांनी यावेळी म्हटलं.
शरद पवारांच्या वक्तव्याशी मी असहमत आहे. मात्र, पवारांच्या वक्तव्याचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधी पक्षांनी या वक्तव्याचा कितीही लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी, काँग्रेस पक्षाचे काहीच नुकसान होणार नाही, असं थोरात म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
कोणत्याही निर्णयावर ठाम नसणं हा राष्ट्रवादीचा इतिहास; मनसेचा टोला
तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली चिंता