मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरे बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत. तर विरोधी पक्ष भाजपकडून मंदिरं सुरू करण्याबाबतची मागणी सातत्याने सुरू आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना चांगलंच सुनावलं.
मंदिरे जरी बंद असली तरी, जनतेसाठी आवश्यक असणारी आरोग्य मंदिरं सुरू आहेत. आजच्या घडीला लोकांसाठी आरोग्य महत्त्वाचं आहे. तसेच राज्यातील मंदीरे ही टप्याटप्याने उघडणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितल.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विविध उपक्रमांचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजपचे काही नेतेही उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात बोलताना कपिल पाटील यांनी, भिवंडी येथे आरोग्य उपकेंद्राची मागणी केली होती. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी यावेळी, “कपिलजी तुमच्याकडे आरोग्य उपकेंद्राची आवश्यकता आहे ना?, आरोग्य केंद्र बंद करुन त्याच्या बाजुला मंदिर उघडु का?”, असं म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“बेळगाव पालिकेवर भगवा फडकलाय?; मग बेळगाव, महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा”
“रुपालीताई, माझ्या जीवाला धोका आहे, मला घेऊन चला; भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी”
परळी आहे सुन्न, मान खाली गेली आहे राज्याची; करूणा शर्मा प्रकरणी पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला