मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पंचगंगा परिक्रमा आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी शेट्टी यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावले. त्यानुसार शेट्टी मुंबईत आले असून मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी चर्चा केली.
महापुराच्या पाण्यात शेतकऱ्यांनी लावलेली पिके वाहून गेली. त्यांचं बुडीत शेतीचं कर्ज माफ करा. केवळ ट्विट करून निर्णय घेणार असल्याची माहिती देऊ नका. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेऊन तसा अध्यादेश निर्गमित करा, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांवर भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. दोन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीने त्रस्त आहे. सरकारने दीड वर्षापूर्वी 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे पैसे अदयाप काही शेतकऱ्यांना मिळाले नाही. ते ताबडतोब शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.
महापुरामुळे शेती बुडाली आहे. त्यामुळे 2019च्या धर्तीवर बुडीत कर्ज माफ करा. पीकच शिल्लक नाही तर कर्ज कसे फेडणार? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी केवळ ट्विट करून निर्णय घेणार असल्याची माहिती देऊ नये. शासन निर्णय व्हायला हवा. सरकारने अध्यादेश काढून जबाबदारी घ्यावी आणि बँकांना तशी सूचना करावी, असंही राजू शेट्टींनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘बेळगाव तो सिर्फ झाँकी हैं, मुंबई अभी बाकी हैं’; चंद्रकांत पाटलांचा टोला
“आज बेळगाव महापालिकेवर ‘भगवा’ फडकला, उद्या तोच ‘भगवा’ मुंबई महापालिकेवर फडकणारच”
पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून सामुहिक बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या 8 जणांना बेड्या
जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून कोणी रोखलं आहे?; राम कदम यांचा सवाल