मुंबई : भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान नेते सुरेश गंभीर हे लवकरच शिवसेनेत घरवापसी करणार असल्याचं समजतंय.
सुरेश गंभीर हे शिवसेनेचे माजी आमदार होते. 2016 मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, बऱ्याच काळापासून ते भाजपवर नाराज होते. सुरेश गंभीर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सुरेश गंभीर आणि त्यांच्या दोन्ही कन्यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, सुरेश गंभीर हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात 1978 साली माहीम परिसरातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते.
महत्वाच्या घडामोडी –
मी वाघ आहे वाघ, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा; चित्रा वाघ यांचा जोरदार पलटवार
“मुंडेंनी कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला, तरी एक दिवस नियती त्यांना सोडणार नाही”
“लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवताय?”
“करूणा मुंडे यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल”