Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा-पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा-पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : एका सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अव्वल ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार टिकणार की नाही, अशा चर्चा सुरू आहेत. यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचं काैतुक केलं. तसेच यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून 32 ते 35 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढलं आहे. त्याचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे. मोदी सरकार हा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज तर काढतंय. त्याचबरोबर देशातल्या बँका विकणं, कंपन्या विकणं, एलआयसीचे खासगीकरण करणे असेही प्रकार सुरू असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, हे सर्व अत्यंत निंदनीय काम सुरु आहे. काँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारनं गमावलं. कंबरतोड करणारी इंधन दरवाढ केंद्राने मागे घ्यावी, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत”

…पण 2024 ला आमचं स्वप्न पूर्ण करू; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला

“हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय”

राज ठाकरेंनी जर परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर…- चंद्रकांत पाटील