बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद आता पुन्हा उफाळत आहे. करुणा मुंडे यांनी फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र पत्रकार परिषदेपूर्वी पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं. यावेळी पोलिसांना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं. यावर आता स्वत: करूणा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना याबाबतची प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करूणा मुंडे यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
आता मी विचारते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?; महिला सरपंच मारहाण प्रकरणी चित्रा वाघ संतापल्या
“राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल”
“शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे, तरीही म्हणतात पाठीत खंजीर खूपसलं नाही”
करूणा शर्मा यांच्या गाडीत आढळलं पिस्तुल, पोलिसांकडून तपास सुरू