मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवावं, मी राजकारण सोडतो, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आवाहन दिलं होतं. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
हातात खंजीर घेतला आणि तो खूपसला असा खंजीर खुपसणे याचा शब्दशः अर्थ होत नाही. त्यामुळे चुकीचा अर्थ काढू नये. भाजप आपल्या शिवाय सरकार स्थापन करू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी कपोकल्पित गोष्टी समोर आणल्या. त्यांनी बेईमानीचं बीज रोवलं., असं मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काँग्रेसबद्दल टोकाची भूमिका होती. तरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी युती तोडली. त्यांना राजकीय संन्यास घ्यायची गरज नाही. जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल, असा टोला मुनगंटीवार यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांवर फक्त पुस्तक येणं बाकी आहे, तरीही म्हणतात पाठीत खंजीर खूपसलं नाही”
करूणा शर्मा यांच्या गाडीत आढळलं पिस्तुल, पोलिसांकडून तपास सुरू
“मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही, संजय राऊतांसारखा कंपाऊंडरही नाही”
खेडमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका; भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश