सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. सांगली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीच्या निमित्ताने हे नेते समोरासमोर आले आहेेत.
सांगली महानगरपालिकेत भाजपचे सर्वात जास्त 41 सदस्य असून राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे मिळून 34 सदस्य आहेत. तर 2 सदस्य हे अपक्ष आहेत. तसेच सांगली महानगरपलिकेत सध्या 1 जागा ही रिक्त आहे.
दरम्यान, 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करत राष्ट्रवादीचा सत्ता स्थापन केली होती. भाजपचे 6 सदस्य फोडून राष्ट्रवादी-काॅंग्रेस आघाडीने आपली महापालिकेवर आपली सत्ता काबीज केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू – नाना पटोले
सरकार कोणत्याही सणांविरोधात नाही तर कोरोनाच्या विरोधात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“गॅस सिलेंडरच्या किंमतीत भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार”