Home महाराष्ट्र मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू – नाना पटोले

मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू – नाना पटोले

मुंबई : मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे, असा आरोप  करत काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मोदी सरकार देशातील सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करतात, असे स्पष्ट दिसून येते. आधीच जनता कोरोनासारखे संकट तसेच महागाईने त्रस्त झाले आहे. यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. आज पुन्हा गॅस 25 रुपयांनी महाग करून केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सतत दरवाढ करत गॅस सिलिंडर 190 रुपयांनी महाग केला. युपीए सरकारवेळी 440 रुपये असणारा हाच LPG गॅस आता 900 रुपयांपर्यंत झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा करून केरोसीन बंद केले आणि आता गॅस 900 रुपयांपर्यंत महाग केला. हे सामान्य जनेतला परवडणारा नाही. नरेंद्र मोदी फक्त त्यांच्या मोजक्या उद्योगपती मित्रांचेच हित जोपासतात. या मोदी सरकारने सात वर्षात तब्बल 25 लाख कोटी रुपयांची नफेखारी केली आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सरकार कोणत्याही सणांविरोधात नाही तर कोरोनाच्या विरोधात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“गॅस सिलेंडरच्या किंमतीत भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार”

महाराष्ट्रात कायदाराज नाही गुंडाराज सुरू; चित्रा वाघ यांची टीका

“…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो”