मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या चर्चा सूरू आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
2 वर्ष संपत आली महाविकास आघाडी सरकारला, महाविकास आघाडी सरकारन अनेक कामं केली आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील अस्वस्थ झाले आहेत., असं हसन मुश्रीफ म्हणाले. राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, चंद्रकांत पाटील हे पलंगावरून जरी खाली पडले, तरी त्यांना महाविकास आघाडी सरकार पडलं असं वाटत आहे, असा टोला हसन मुश्रीफांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला 2 पदकं; भालाफेकपटू सुमित अंतिलने कोरलं सुवर्णपदकावर नाव”
“ठाकरे सरकारचे घोटाळा इलेव्हन; किरीट सोमय्यांचा आरोप, 11 नावं जाहीर”
पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झालीये- नाना पटोले
“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात”