जळगाव : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बोलताना, ईडी लावली तर सीडी काढेन, असं वक्तव्य आधी केलं होतं. त्यानंतर त्यांनी आज त्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला. ते मुक्ताईनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी या अगोदर म्हणालो होतो की, ईडी लावली तर सीडी लावेन. गेल्या 5-6 महिन्यांपुर्वीच ती सीडी मी पोलिसांकडे दिली आहे. आता पोलीस त्याची चौकशी करत असून चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी बोलताना यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, जे भ्रष्टाचार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो. त्यामुळे मला आता अपेक्षा आहे की, दादांनी शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी, असा टोला खडसेंनी चंद्रकांत पाटलांना यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग यांच्या मुसक्या आवळणंं गरजेचं- हसन मुश्रीफ
मुंबई महापालिका स्वबळावर जिंकली पाहिजे, कुणाची लाचारी आपल्याला नको- संजय राऊत
“ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले असतील, त्यामुळेच त्यांनी परब यांना नोटीस पाठवली असेल”
भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली की, संसद आत्महत्या करते- पृथ्वीराज चव्हाण