मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यात मोहसीन शेख नावाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं होतं. त्याच्या या कामगिरीची दखल घेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडून त्याला मोठं बक्षिस मिळालं.
या कामगिरीचं कौतुक म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरे यांनी मोहसीनची सहसचिवपदी नियुक्ती केली. मात्र ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपातील असून 6 महिन्यानंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून त्याला कायम करण्यात येईल, असं युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने सांगितलं.
दरम्यान, वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान केलं. राणे-शिवसेना वादात मोहसीन शेख हा जुहू येथे नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर झालेल्या आंदोलनात अग्रभागी होता. पोलिसांनी त्याला यावेळी कपडे फाटेस्तोवर मारलं होतं. पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाल्यानं त्याला रूग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर या मारहाणीची क्लीप सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली होती.
महत्वाच्या घडामोडी –
“वरूण सरदेसाई, आमच्या घरावर हल्ला करतोस काय, आता आलास तर परत जाणार नाहीस “
आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ- नारायण राणे
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बंददाराआड खलबतं, चर्चांना उधाण”
तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, कारण हे सरकार देश विकण्यात व्यस्त आहे- राहुल गांधी