रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. मात्र लगेच रात्री उशिरा त्यांचा जामीन मंजूरही झाला. यानंतर राणेंनी जनआशिर्वाद यात्रेस सुरूवात केली. राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर तसेच राणेंच्या घरासमोर राडा करणारे युवासेना नेते वरूण सरदेसाई यांच्यावर हल्लाबोल केला.
माझा एकदा घसा ठिक होऊ द्या, एकेकाला सोडणार नाही. माझा आवाज पूर्वीसारखा झाल्यावर मी खणखणीत वाजवणार, मी 40 वर्षे सोबत होतो. माझ्याकडे मोठा मसाला आहे. शिवसेना औषधाला सुद्धा सापडणार नाही, असा इशारा राणेंनी यावेळी दिला. तसेच यावेळी बोलताना राणेंनी वरूण सरदेसाई यांना सुद्धा इशारा दिला.
तो वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करतो काय, आता आलास तर परत जाणार नाही. आमच्या घरावर हल्ला करणारांना सोडणार नाही, असा इशारा राणेंनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ- नारायण राणे
आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ- नारायण राणे
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बंददाराआड खलबतं, चर्चांना उधाण”
तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, कारण हे सरकार देश विकण्यात व्यस्त आहे- राहुल गांधी
“राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट नाकारली?; चर्चांना उधाण”