रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही. आम्हीही सत्तेत येऊ, असं राणे म्हणाले. तसेच यावेळी बोलताना राणेंनी पोलिसांवरही निशाणा साधला. पोलिसांनी कायद्याने कारवाई करावी. अन्यथा पुढे काय होईल त्याला सामोरे जावं, असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला.
दरम्यान, आम्हीही भविष्यात महाराष्ट्रात सत्तेत येऊ. केंद्रात सत्तेत आहोत. वरिष्ठांकडून काहीही आदेश आले तरी अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत कारवाई केली पाहिजे. नाही तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल, असंही राणेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बंददाराआड खलबतं, चर्चांना उधाण”
तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, कारण हे सरकार देश विकण्यात व्यस्त आहे- राहुल गांधी
“राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट नाकारली?; चर्चांना उधाण”
“राज्यात पुन्हा संचारबंदी लागणार?; केंद्राने दिल्या राज्याला स्पष्ट सूचना”