मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती होती, मात्र गुरुवारी ही भेटच न झाल्याने राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना भेट नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राजभवनानं यावर वेगळंच स्पष्टीकरणं दिलंय. अशी कुठल्याही भेटीसाठी वेळ घेण्यात आलेली नव्हती, असं राजभवनातून स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे राज्यपालांची वेळ घेण्यासाठी राजभवनावर गेले होते, मात्र यावर राज्यपालांनी, माझे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. शिष्टमंडळ येणार असल्याची पू्र्वकल्पना दिलेली नव्हती. त्यामुळे लगेच वेळ देता येणे शक्य नाही, असं राज्यपालांनी नार्वेकरांना सांगितल्याच्या बातम्या समोर आल्या.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर, राज्यपालांनी ही भेट नाकारली असा धक्कादायक आरोप केला. नानांच्या या आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राज्यात पुन्हा संचारबंदी लागणार?; केंद्राने दिल्या राज्याला स्पष्ट सूचना”
भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर, काही नेते माझ्या संपर्कात; नाना पटोलेंचा दावा
नारायण राणे-शिवसेना प्रकरणावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
“केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात”