मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही. पहिल्यांदाच तुम्हाला बातमी देतोय. देशाच्या शिष्टाचारानुसार क्रम सांगायचा तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. या सरकारचं गेल्या 20 महिन्यात काय चाललंय? कोण यांना सल्लागार मिळाला माहीत नाही. कोर्टात ते प्रत्येक विषयावर फटके खात आहेत. तसं आता खातील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
शिवसैनिकांनी केस दाखल करणं समजू शकतो. पण अटक? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले. त्याचं काय करायचं? मुख्यमंत्री असताना दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण काढा. त्यावर किती केसेस दाखल करायच्या?, असा सवालही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
मी शिवसेनेला घाबरत नाही; आमचं पण वरती सरकार पाहू सेना किती उडी मारते- नारायण राणे
“खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या, तुम्हांला तुमची औकात दाखवून देऊ”
“केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना”
“उद्धव ठाकरेंविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्यांचे हात छाटण्याची शिवसेनेत धमक”