Home महाराष्ट्र “ज्या महापाैरांच्या कार्यक्रमाला गर्दी होते, त्या जनआशिर्वाद यात्रेवर कशा बोलू शकतात?”

“ज्या महापाैरांच्या कार्यक्रमाला गर्दी होते, त्या जनआशिर्वाद यात्रेवर कशा बोलू शकतात?”

मुंबई : भाजपतर्फे जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. यावरून मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत या यात्रेची खिल्ली उडवली.

कोरोनाच्या काळात जनआशिर्वाद यात्रा काढली, पण जनता भाजपला आशीर्वाद देणार नाही. जनताच भाजपला त्रासली आहे. त्यामुळे जन आशीर्वाद मिळणार नाहीत. तसेच ‘ही कसली जन आशीर्वाद यात्रा? ही तर जन छळवणूक यात्रा आहे,’ असं म्हणत पेडणेकर यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भांडूपमध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कार्यक्रमाला फटाके वाजविण्यासाठी किती गर्दी होती. अशावेळी महापौर जन आशीर्वाद यात्रेवर कशा बोलू शकतात?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी यावेळी पेडणेकर यांना केला.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपनं पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

…तर सोमय्या यांनी राणेंच्या बंगल्याचीही पाहणी करावी; शिवसेनेचं किरीट सोमय्यांना आव्हान

मंदिरे हा केवळ भावनेचा विषय नव्हे तर…; मनसेची राज्य सरकारवर टीका

भाजप आणि राज ठाकरेंच्या युतीला माझ्याकडून शुभेच्छा- खासदार सुप्रिया सुळे