Home महाराष्ट्र “काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यास फुल्ल परवानगी, मात्र शिवसेनेला हात लावायचा नाही...

“काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यास फुल्ल परवानगी, मात्र शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय”

कोल्हापूर : सत्तेत एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्रा.नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलं. यावर राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली.

सरनाईकांनी असा आरोप केला असला तरी, राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हापरिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. प्रताप सरनाईक यांचं हे कारण जुजबी असावं, असं हसन मुश्रीफ म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सरकार स्थापन होत असताना असा काही करार झालाय का एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत, असा प्रश्न हसन मुश्रीफांना विचारण्यात आला. त्यावर मुश्रीफ यांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे, असं म्हटलं.

दरम्यान, भाजपकडून सुडाचं राजकारण सुरु आहे. भाजपकडून ज्या धमक्या दिल्या जात आहेत, अशा धमक्यांना शिवसेनेचे वाघ घाबरत नाहीत, असं देखील मुश्रीफांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राऊत यांना ज्या दिवशी शिवसैनिकच मारतील, त्यादिवशी…; निलेश राणेंचा हल्लाबोल

“राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी”

महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे…; नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ