रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील निर्माणाधीन बंगल्याला तोडण्याचे काम सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या उद्या या कारवाईची पाहणी करण्यासाठी दापोलीला जाणार आहे. त्यावरून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमय्यांवर टीका केली आहे.
सोमय्या यांनी केवळ नार्वेकरांच्या बंगल्यांचीच पाहणी करू नये. तर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यांचीही पाहणी करावी, असं आव्हान वैभव नाईक यांनी किरीट सोमय्यांना दिलं आहे. ते मीडियाशी संवाद साधताना बोलत होते.
मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेल्या बंगल्याचे पडलेले बांधकाम पाहायला येण्याआधी नारायण राणे यांचा जुहूमधील ‘अधीश’ बंगला आणि सिंधुदुर्गात केलेल्या अनधिकृत बांधकामाचीही पाहाणी करावी, असं वैभव नाईक म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
मंदिरे हा केवळ भावनेचा विषय नव्हे तर…; मनसेची राज्य सरकारवर टीका
भाजप आणि राज ठाकरेंच्या युतीला माझ्याकडून शुभेच्छा- खासदार सुप्रिया सुळे
मिलींद नार्वेकर यांचा बंगलो तोडला, आता पुढचा नंबर अनिल परबांचा- किरीट सोमय्या
…अन् भर रस्त्यात तरूणीला काही समजायच्या आतच तरूणानं घेतली किस; पहा व्हिडिओ