Home महाराष्ट्र मंदिरे हा केवळ भावनेचा विषय नव्हे तर…; मनसेची राज्य सरकारवर टीका

मंदिरे हा केवळ भावनेचा विषय नव्हे तर…; मनसेची राज्य सरकारवर टीका

मुंबई : राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा मिळाली आहे. शॉपिंग मॉल आणि इतरही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापही सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी नाही. यावरुन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही राज्य सरकारवर टीका केली.

केवळ मंदिरे उघडल्याने कोरोनाचा प्रसार होतो असे कोणत्या सर्वेक्षणात आले आहे का? मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अनेक शहरांच्या अर्थकारणाचा विषय आहे. त्वरित सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

दरम्यान, जशी नियमावली सगळ्यांना लागू होते तशीच इथेही लागू करावी. राज्यातील प्रार्थनास्थळे कधी उघडणार, तेथील अर्थकारण कधी सुरू होणार, मुख्यमंत्री कधी भूमिका घेणार हेच पाहावे लागणार आहे, असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप आणि राज ठाकरेंच्या युतीला माझ्याकडून शुभेच्छा- खासदार सुप्रिया सुळे

मिलींद नार्वेकर यांचा बंगलो तोडला, आता पुढचा नंबर अनिल परबांचा- किरीट सोमय्या

…अन् भर रस्त्यात तरूणीला काही समजायच्या आतच तरूणानं घेतली किस; पहा व्हिडिओ

एकनाथ शिंदेच नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री नाराज; चंद्रकांत पाटलांचा दावा