मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन-आशीर्वाद यात्रेचं शिवाजी पार्क येथून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेवून सुरुवात केली. मात्र त्या नंतर काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलाच वाद रंगला. अशातच नीलम गोऱ्हे यांनीही नारायण राणेंवर निशाणा साधलाय.
बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप, असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.
एका बाजूला बाळासाहेबांप्रति आदर व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी राज्याची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्या उद्धव ठाकरेंविषयी सातत्याने गरळ ओकायची म्हणजे दुतोंडी सापासारखे ह्यांचे वर्तन आहे, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, मंत्री पद मिळाले म्हणून सतत बोलत राहून लोकांची दिशाभूल करत राहणे एवढाच त्यांचा अजेंडा आहे. मराठीत म्हण आहे ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ तशा पद्धतीचं त्यांचे बोलणं आहे, असंही निलम गोऱ्हेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“RCB साठी खुषखबर! भारताची डोकेदुखी वाढविणारा अष्टपैलू खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात”
“लाॅकडाऊन लावण्याशिवाय मुख्यमंत्र्यांना येतं तरी काय?; खंडणी गोळा करता येते म्हणा”
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार?; गुलाबराव पाटील करणार मध्यस्थी