Home पुणे … म्हणून चंद्रकांत पाटलांनी अधिकाऱ्यांना दिलं चॉकलेट

… म्हणून चंद्रकांत पाटलांनी अधिकाऱ्यांना दिलं चॉकलेट

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं. पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना थेट चॉकलेट दिलं.

चंद्रकांत पाटील  पुण्यातील चांदणी चौकात रस्त्यांच्या कामांची पाहणी केली होती. चांदणी चौकातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे लवकर बुजवण्याचे आदेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आज पाटील यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली आणि काम पाहून तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट दिलं.

पावसाळ्यात चांदणी चौकातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर आज 8 दिवसांनी चंद्रकांत पाटील यांनी रात्री 10 नंतर रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी रस्त्यावरचे खड्डे काही प्रमाणात बुजवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र, अजूनही बरंच काम पूर्ण व्हायचं बाकी आहे. 24 ऑगस्टला पाटील पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाची पाहणी करणार आहेत. आज काही प्रमाणात काम पूर्णत्वाकडे जात असल्याचं पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना चॉकलेट दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“…अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु”; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

“राज्य सरकारने मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याची सवय आता बंद करावी”

भाजपच्या जन आशीर्वाद कोरोना नियमांचे उल्लंघन; चार गुन्हे दाखल

“देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून, बैलगाडी शर्यतीचा प्रश्न मार्गी लावावा”