मुंबई : शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झालं आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यावर या दोनही पक्षांचं एकमत झाल्याने आता शिवसेने कडून उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं असा आग्रह शिवसेना नेत्यांनी धरलाय.
उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आणि उद्धव यांचे विश्वासू सुभाष देसाई यांचंही नाव आघाडीवर आहे.
शिवसेनेत घडामोडींना वेग येणार असून शुक्रवारच्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, आदित्य हे तरुण आहेत त्यांनी थोडा अनुभव घेतला पाहिजे असा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिला होता.