Home महाराष्ट्र शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यानंतर काँग्रेस करणार उद्या विधीमंडळ नेत्यांची निवड

शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यानंतर काँग्रेस करणार उद्या विधीमंडळ नेत्यांची निवड

मुंबई | विधानभवनात उद्या काँग्रेसची बैठक पार पडणार असून या बैठकीत विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने विधिमंडळ नेत्यांची निवड केली होती. आता काँग्रेस विधिमंडळ नेत्याची निवड उद्या करणार आहे.

बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आहे

दरम्यान, शिवसेनेसोबत सत्तास्थापनेच्या दृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा अंतिम झाली आहे. उद्या आम्ही मुंबईत जाऊन आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करु, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.