मुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला होता. मी राज्यपालांचं विधान ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तर तुम्ही का विचारताय. पण पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, असा टोला शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला होता. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद देत शरद पवारांवर टीका केली होती.
राज्यपाल यांचं वय झालं आणि पवार साहेब यांचं वय झालं नाही का? कुणी कुणाच्या वयावर बोलू नये. तसेच सदस्यांची नियुक्ती करायची की नाही हा राज्यपालांचा अधिकार असल्याचे कोर्टाने देखील म्हटलं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली.
पवार बोलल्यानंतर चंद्रकांत पाटील राज्यपालांच्या मदतीला धावून गेले. पहिली गोष्ट राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्टी चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे. हे कोथरूड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावं, असा टोला रूपाली चाकणकरांनी चंद्रकांत पाटलांना यावेळी लगावला.
चंद्रकांत दादा आपल जितक वय आहे तितक आदरणीय साहेबांची संसदीय कारकीर्द आहे…(1/2)@ChDadaPatil pic.twitter.com/ZBXO0TtBcY
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 17, 2021
महत्वाच्या घडामोडी –
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत…; पंकजा मुंडेंचा आक्रमक पावित्रा
नारायण राणेंचं ठरलं: बाळासाहेबांच्या आशीर्वादाने करणार यात्रेची सुरूवात
“उद्धवजी, माझ्या आई-वडीलांना वाचवा; पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याची विनवणी”
मोदी नसते तर आज भारताची अवस्थाही अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगणा रणाैत