Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; मनसेचा टोला

राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; मनसेचा टोला

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीपातीचं राजकरण करत असल्याचा आरोप केला होता. यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंना वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं होतं.

राज ठाकरे यांच्यावर न बोललंच बरं. त्यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं, असा सल्ला शरद पवारांनी राज ठाकरे यांना दिला होता. त्यावरून मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे., असा टोला संदीप देशपांड यांनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“चंद्रकांत दादा, जितकं तुमचं वय, तेवढी पवार साहेबांची संसदीय कारकिर्द; रूपाली चाकणकरांचा टोला

जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत…; पंकजा मुंडेंचा आक्रमक पावित्रा

नारायण राणेंचं ठरलं: बाळासाहेबांच्या आशीर्वादाने करणार यात्रेची सुरूवात

“उद्धवजी, माझ्या आई-वडीलांना वाचवा; पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याची विनवणी”