कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पत्रकार परिषद घेतली. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील नेत्यांना हे आव्हान दिलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत वस्तुस्थिती काय आहे आणि काय करावे याबद्दल राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींची जाहीर चर्चा चॅनेल्सच्या कॅमेऱ्यांसमोर करावी. भाजपातर्फे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बाजू मांडतील आणि लोकांसमोर एकदा खरे काय आणि खोटे काय हे स्पष्ट होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत अपयश लपविण्यासाठी शरद पवार यांनी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देण्यासाठी केलेल्या घटनादुरुस्तीबाबत चुकीची माहिती दिली आहे. या घटनादुरुस्तीबाबत अपप्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जेथे जेथे सभा घेईल तेथे तेथे लगेचच भाजपतर्फे त्यांचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि जनतेला सत्य सांगण्यासाठी पोलखोल सभा आयोजित केल्या जातील, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद. https://t.co/LGp2mcYRth
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पुणे जिल्ह्यात शिवसेनेला धक्का; शिवसेनेच्या ‘या’ आक्रमक महिला नेत्या लवकरच भाजपात!
सात कशाला, हीच पिढी शिवसेनेला संपवेल; निलेश राणेंचं प्रत्युत्तर
जवळचा मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायम मनात राहील; आर आर आबांविषयी बोलताना अजित पवार भावूक
पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळं त्यांच्या लक्षात आलं नसेल; शरद पवारांचा राज्यपालांना टोला