सिंधुदुर्ग : जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे. भाजपने तो चोरला आहे, असा आरोप करत नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती.त्याला नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर शिवसेनेसह विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही, असा पलटवार निलेश राणेंनी केला आहे.
नारायण राणेंसारखा वजनदार माणूस कोकणासाठी काय करू शकतो हे राऊतांना कळणार नाही. कारण त्यांनी साधी बालवाडीसुद्धा कोकणात सुरू केली नाही. त्यांना राणेंचे महत्व समजणार नाही. कोकणातील हीच पिढी शिवसेनेला संपवेल. त्यामुळे सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही, याची खात्री आम्ही घेतली आहे. लोकही घेतील, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
विनायक राऊत हे दखलपात्र नाही. मात्र राणेंची हीच पिढी जे काही करायचं ते करणार आहे. राणेंचा पुढच्या जन्मावर विश्वास नाही. आम्ही काही करण्यापेक्षा कोकणातील जनताच आता शिवसेनेला संपवेल, याची आम्हाला खात्री आहे, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
जवळचा मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायम मनात राहील; आर आर आबांविषयी बोलताना अजित पवार भावूक
पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळं त्यांच्या लक्षात आलं नसेल; शरद पवारांचा राज्यपालांना टोला
“फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की, स्मृतींना तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा”
काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी”