Home नागपूर ‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपची पुन्हा एकदा युती

‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपची पुन्हा एकदा युती

नागपूर : राज्यात शिवसेनेने भाजपशी युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली. मात्र राज्यात एकमेकांविरुद्ध ताशेरे ओढणारे हे दोन्ही पक्ष नागपूरातील एका नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुटीबोरी नगरपरिषद दत्तक म्हणून घेतली आहे. या नगरपरिषदेत शिवसेना खासदार कृपाल तुमाने आणि भाजप आमदार समिर मेघेयांच्या प्रयत्नानं बुटीबोरी नगरपरिषदेसाठी दोन्ही पक्षांनी युती केली आहे .

बुटीबोरी नगरपरिषदेच्या सभापती निवडीसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानं बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे पाच तर शिवसेनेचा एक सभापती बिनविरोध निवडून आले आहेत.

दरम्यान राज्यातही भाजप शिवसेने एकत्र येत हेच मॉडेल राबवले पाहिजे,अशी प्रतिक्रिया बबलू गौतम यांनी दिली आहे .

महत्वाच्या घडामोडी –

“भागवतराव कराडांची बरोबरी करण्याचं सोडाच, पण इम्तियाज जलील चंद्रकांत खैरेंपेक्षाही चांगले नेते”

पंकजा मुंडेंना अडचणीत आणणारा चिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत; न्यायालयाने विचारले अजून … ?

“वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग, उनसे डरना बंद कर देंगे”

राहुल गांधींना संसदेतून वर्षभरासाठी निलंबित करा; रामदास आठवलेंची मागणी