मुंबई : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल बोलताना भाजप नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर टीका केली होती. रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी भागवत कराड यांच्यावरही टीकास्त्र सोडलं.
भागवत कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असंही चंद्रकांत खैरेंनी यावेळी म्हटलं. यावर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत खैरे यांची भागवतराव कराड यांच्याशी बरोबरी करणं सोडाच पण एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलीलही चंद्रकांत खैरेंपेक्षा चांगले खासदार आहेत, असा टोला प्रशांत बंब यांनी चंद्रकांत खैरेंना यावेळी लगावला. तसेच चंद्रकांत खैरे स्वत:ला भागवतराव कराडांपेक्षा मोठा नेता म्हणवतात. पण खैरे भागवत कराडांची बरोबरी कधीच करु शकत नाहीत. औरंगजेब आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी औरंगाबाद शहर खिळखिळे केल्याची टीका प्रशांत बंब यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
पंकजा मुंडेंना अडचणीत आणणारा चिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत; न्यायालयाने विचारले अजून … ?
“वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग, उनसे डरना बंद कर देंगे”
राहुल गांधींना संसदेतून वर्षभरासाठी निलंबित करा; रामदास आठवलेंची मागणी
“…तरी भाजपच सर्वाधिक जागांवर निवडून येईल”- देवेंद्र फडणवीस