मुंबई : निवडणुकांबाबत सरकारची मनमानी सुरू आहे. जेव्हा त्यांना निवडणुका घ्यायच्या असतात तेव्हा निवडणूक आयोगाला फेव्हरेबल रिपोर्ट पाठवला जातो, असं म्हणत विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
निवडणुका झाल्या तर भाजप मोठ्या मताधिक्क्याने निवडून येईल, असं वाटत असल्यानेच महाविकास आघाडीचे सरकार निवडणुका टाळत आहेत. निवडणुका लांबणीवर टाकल्यास आपल्याला अधिक जागा मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. पण निवडणुका पुढे ढकलल्या तरी भाजपच सर्वाधिक जागांवर निवडून येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांनी आधी आत्मपरीक्षण करावं, मग सरकारकडे बोट दाखवावं”
“…हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला असलेला डाग”
हिंदुत्व ही बाळासाहेबांसाठी ‘साधना’, तर उद्धव ठाकरेंसाठी…; गोपीचंद पडळकरांची टीका
“संजय राठोडांच्या विरोधात आणखी एका महिलेची पोलिसात तक्रार; चित्रा वाघ यांनी दिली माहिती