जळगाव : भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना त्यांची कन्या रोहिणी खडसे अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीकडून नोटीस आली आहे.
मुक्ताई खासगी साखर कारखान्याला कर्ज उपलब्ध करुन देण्यासह बँकेतील इतर आर्थिक व्यवहारासंबंधात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ईडीने नोटीस पाठवून माहिती मागवली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने नव्याने सहकार खाते निर्माण झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी केंद्रीय सहकार विभागाकडे राज्यातील काही साखर कारखान्यांतील व्यवहारांसंदर्भात चौकशी करण्यासाठी पत्र दिले होते. त्या अनुषंगाने ईडीने जिल्हा बँकेकडूनही मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाबाबत माहिती मागवली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला ब्रेक; राज्य सरकारचा निर्णय
‘अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ, भाजपचा ‘हा’ मोठा नेता अडचणीत”
…तरी पंकजाताईंच्या सत्कारानंतर यात्रेची पुढची वाटचाल करणार; केंद्रीय मंत्री भागवत कराड भावुक
मुंबईतल्या समुद्रात 50 हजार कोटींचा पूल उभारणार- नितीन गडकरी