नवी दिल्ली : भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. राजधानी नवी दिल्लीत ही भेट झाली.
2 दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दोन्ही पाटलांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
दरम्यान, राज्यातील बहुतांश भाजप नेते नवी दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातून नव्याने केंद्रीय मंत्री झालेल्या मंत्रीमहोदयांची राज्यातील भाजप नेते भेट घेत आहेत. या भेटीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा, बैठका, पक्षासाठीचं येणाऱ्या काळातील प्लॅनिंग होत आहे.
देशाचे गृहमंत्री व नवनिर्वाचित सहकार मंत्री मा.@AmitShah जी यांची दिल्ली येथे भेट घेतली. pic.twitter.com/VEhST6ZSET
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) August 10, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“दारूच्या त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात, भाजपने त्या बाटल्या लॅबमध्ये पाठवाव्यात”
…तर मग हे शुद्धीत कसे असणार?; नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका
“मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची संधी केंद्राने गमावली”
मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडणं ही शरमेची बाब- सुधीर मुनगंटीवार