मुंबई : मंत्रालयातील उपाहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. यावरुन विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रालयाला तुम्ही कशाला बदनाम करताय? मंत्रालयात काही तरी बाटल्या सापडल्याचं भाजपचं म्हणणं आहे. त्याचा आम्हाला दिल्लीतून वास येत नाही तेवढा., असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
दरम्यान, आम्हाला कोणता वास काय कळत नाही. आता कोण वास घ्यायला गेलंय बाटल्यांचा हे पाहावं लागेल. पण मला कोण्या तरी अधिकाऱ्याने सांगितलं की या साधारण दीड वर्षांपूर्वीच्या बाटल्यांचा हा खच आहे. या बाटल्या आताच्या नाही दीड वर्षापूर्वीच्या आहेत. कदाचित आमचं सरकार नसावं त्यावेळेला. या मधल्या संपूर्ण काळामध्ये मंत्रालयात कुणाचा वावर नव्हता. वर्षभर तर मंत्रालय बंदच होतं. आता हळूहळू सुरू झालं आहे. माणसं जात आहेत. आता या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असं संजय राऊतांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
…तर मग हे शुद्धीत कसे असणार?; नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका
“मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची संधी केंद्राने गमावली”
मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडणं ही शरमेची बाब- सुधीर मुनगंटीवार
ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणार नाही तर मग काय…; निलेश राणेंचा घणाघात