Home महाराष्ट्र …मग हा टाइमपास कशाला? निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

…मग हा टाइमपास कशाला? निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा द्यावा, असं राज्य सरकारचे म्हणणं आहे. हीच मागणी सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये 377 अंतर्गत एम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने द्यावा ही मागणी केली. 377 अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देण्याची तरतूद नाही. मग ह्या आयुधा अंतर्गत हा महत्त्वाचा प्रश्न विचारून काय होणार आहे? हा टाइमपास कशाला?, असं निलेश राणे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

मंदिर बंद ठेवून, बार सुरू करणं हे या सरकारचं धोरणच; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र लवकरच ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारं पहिलं राज्य ठरणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

“प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन”