Home महाराष्ट्र पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करा; अमृता फडणवीसांची सरकारकडे मागणी

पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करा; अमृता फडणवीसांची सरकारकडे मागणी

मुंबई : पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावं, त्यांना प्रवासांचे पासेस मिळायला हवेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारकडे केली.

लस सर्वांनी घेतली पाहिजे. लशींची कमतरता आहे पण 15 ते 20 दिवसात लस उपब्लध होतील, असं म्हणत मी स्वत: लवकरच व्हॅक्सीन घेणार आहे. कलाकारांकडे आपण लक्ष द्यायला हवे. सर्व गोष्टी करायला पाहिजे, सरकार करत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अमृता फडणवीसांनी आज धारावीमध्ये कलाकारांना रेशन किटचे वाटप केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान, धारावीच्या जनतेनं शक्तिशालीरीत्या कोरोनाशी झुंज दिली. धारावीतील लोकांनी एकत्रित येऊन नियमांचं पालनं केलं, त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्याचंही अमृता फडणवीसांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“लसीकरणामध्ये गुजरातचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं”

“वादळग्रस्तांना मदत जाहीर करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे झोळी पसरायची तयारी केलीय”

…पण कोकणवासीय तुम्हाला कोल्हापुरी दाखवतील- प्रवीण दरेकर

“३ तासाच्या कोकण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी किती गावांना भेटी दिल्या”