Home महाराष्ट्र लोकल सुरू करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही- संजय राऊत

लोकल सुरू करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही- संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. यावर केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकल सुरु करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही, असा पलटवार संजय राऊत यांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत आहे. तसेच आता लोकलसाठी कोणाशी चर्चा करायची? चर्चाच करायची झाली तर आम्ही ती कॅबीनेट मंत्र्यांशी करु. दानवेंशी चर्चा करायची गरज नाही. , असा टोला संजय राऊत यांनी यावेळा लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचे नाही, त्यामुळे…”

काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा

पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो- महादेव जानकर

“दिल्लीत खलबतं सुरूच; देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला, चर्चांना उधाण”